अंबादास टल्लू फाउंडेशनतर्फे पुरस्कार वितरण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबादास टल्लू फाउंडेशनतर्फे
पुरस्कार वितरण सोहळा
अंबादास टल्लू फाउंडेशनतर्फे पुरस्कार वितरण सोहळा

अंबादास टल्लू फाउंडेशनतर्फे पुरस्कार वितरण सोहळा

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : विविध क्षेत्रांतून पद्म गौरव पुरस्कार मिळविलेल्या शहर व परिसरातील दिग्गजांचा अंबादास टल्लू फाउंडेशनतर्फे सोमवारी (ता. २७) कोथरूड येथील ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ येथे सायंकाळी साडेपाच वाजता सत्कार व गौरव समारंभाचे आयोजन केले आहे. ‘थोरांचा गौरव थोरांच्या’ हस्ते असे, या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट व स्वरूप आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद पद्मविभूषण डॉ. कांतिलाल हस्तिमल संचेती हे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर हे उपस्थित राहणार आहेत.