बाणेरमध्ये आठ लाखांचे मेफेड्रॉन जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाणेरमध्ये आठ लाखांचे मेफेड्रॉन जप्त
बाणेरमध्ये आठ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

बाणेरमध्ये आठ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

sakal_logo
By

पुणे : पोलिसांनी एका व्यक्तीच्या ताब्यातून चार लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन अमली पदार्थ, कार आणि मोबाईल, असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने बाणेर येथे ही कारवाई केली. आसिफअली अलीमुद्दीन शेख (वय ३६, रा. हलावपूल, कुर्ला पश्चिम, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात एकजण कारमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला असता बाणेर येथील योगी पार्क सोसायटीजवळ कारमध्ये एक संशयित व्यक्ती दिसून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, अंगझडतीमध्ये चार लाख रुपये किमतीचे २० ग्रॅम मेफेड्रॉन, तीन मोबाईल आणि रोकड आढळून आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.