
चुकवू नये असे काही
१) ‘स्वरभाव पुरस्कार’ वितरण
महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेतर्फे या वर्षीपासून ‘स्वरभाव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून यंदा मेवाती परंपरेतील युवा गायक साईप्रसाद पांचाळ यांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ समीक्षक-कवी मा. कृ. पारधी यांच्या हस्ते पांचाळ यांना पहिला ‘स्वरभाव पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. त्यानिमित्त साईप्रसाद पांचाळ यांची शास्त्रीय गायनाची मैफल देखील होणार आहे.
कधी ः गुरुवार (ता. २३)
केव्हा ः सायंकाळी ६.३० वाजता
कुठे ः ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग
२) ‘जर्नी विथ एअरब्रश’
ज्येष्ठ कलाकर शिवाजी एरंडे आणि सतीश घाटपांडे यांच्या कलाकृतींचे ‘जर्नी विथ एअरब्रश’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या दोन चित्रकारांनी एअरब्रशच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षांत विविध चित्रे रेखाटली आहेत. त्यातील निवडक चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील.
कधी ः गुरुवार (ता. २३) ते शनिवार (ता. २५)
केव्हा ः सकाळी १० ते सायंकाळी ७.३०
कुठे ः बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता
३) हस्तलिखितांचे प्रदर्शन
गेल्या १३६ वर्षांपासून संस्कृत भाषेचे संवर्धन, जतन आणि उन्नयन करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘आनंदाश्रम’ या संस्थेतर्फे ‘आनंदाश्रम परिक्रमा-२’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत १३७१ पासूनच्या वेद, वेदांग, ज्योतिष, गणित, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील दुर्मिळ हस्तलिखितांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच, या दरम्यान ‘संस्कृत साहित्यातील प्रेमरंग’ या विषयावर दररोज सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
कधी ः शुक्रवार (ता. २४) ते रविवार (ता. २६)
केव्हा ः सकाळी १० ते सायंकाळी ८
कुठे ः आनंदाश्रम संस्थेचे ग्रंथालय, अप्पा बळवंत चौक
४) ‘मेंडोलिन मॅजिक’
शंकर जयकिशन फाउंडेशन, अहमदाबाद आणि स्वराली म्युझिकल ग्रुपतर्फे मेंडोलिन या वाद्यावर आधारित ‘मेंडोलिन मॅजिक’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेंडोलिन वादक आणि अभ्यासक सुधाकर भागवत हा कार्यक्रम सादर करतील. कार्यक्रमाच्या दृकश्राव्य विभागाची जबाबदारी शरद आढाव यांनी सांभाळली असून निवेदन डॉ. मानसी अरकडी यांचे आहे.
कधी ः शुक्रवार (ता. २४)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, प्रभात रस्ता