‘एटीव्हीसी’ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

‘एटीव्हीसी’ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

पुणे, ता. २२ ः इन्फिलीग मोटर स्पोर्ट्सतर्फे सहाव्या ‘अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप (एटीव्हीसी) २०२३’चे येत्या १ ते ५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशन व इनोव्हेशन फेस्टिव्हल असलेली ही स्पर्धा तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी येथे होत आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, गो ग्रीन व मेक इन इंडिया या उपक्रमांचे विविध आविष्कार पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती इन्फिलीग मोटरस्पोर्ट्सचे संस्थापक पवन तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. विलास देवतरे, इन्फिलीगचे सीएमओ चंद्रेश शर्मा, संचालक (विपणन) आदित्य संकलेचा, ओरायझन इंडियाच्या कार्यक्रम संचालक रीमा कुमारी आदी उपस्थित होते. यावेळी ‘एटीव्हीसी २०२३’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com