Sat, March 25, 2023

हवेली तहसील कार्यालयात
सातबारा मिळण्यास अडचणी
हवेली तहसील कार्यालयात सातबारा मिळण्यास अडचणी
Published on : 22 February 2023, 1:33 am
पुणे, ता. २२ : हवेली तहसील कार्यालयात तांत्रिक कारणामुळे सातबारा उतारा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही अडचण दूर करून सातबारा उतारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वंचित आघाडीचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केली आहे. हवेली तहसील कार्यालयात गेल्या सहा ते सात दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे सातबारा उतारा मिळत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना जात पडताळणी आणि इतर न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या संदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी बहुले यांनी केली आहे.