
होळीसाठी पुण्याहून विशेष रेल्वे धावणार
पुणे, ता. २२ ः पुणे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘होळी’साठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याहून दानापूर, अजनी व करमाळीसाठी विशेष रेल्वे धावणार आहे.
------- ---
पुणे ते दानापूर विशेष रेल्वे :
गाडी क्र.०११२३ पुणे - दानापूर एक्स्प्रेस शनिवार, ०४ मार्च रोजी पुण्याहून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. सोमवारी पहाटे साडेचार वाजता पोचेल. गाडी क्रमांक ०११२४ दानापूरहुन ६ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पोचेल. दौंड कार्ड लाईन,
अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा आदी स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे.
--------------------
पुणे ते अजनी विशेष रेल्वे :
गाडी क्र. ०१४४३ पुणे - अजनी सुपरफास्ट एक्स्प्रेस २८ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान दर मंगळवारी पुण्याहून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी अजनीला पोहोचेल. गाडी क्र. ०१४४४ अजनीहुन १ ते १५ मार्च दरम्यान दर बुधवारी रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी पुण्याला सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पोचेल. गाडीला दौंड कार्ड लाईन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला,
बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
----------------------------
पुणे - करमाळी विशेष रेल्वे :
गाडी क्र. ०१४४५ पुणे - करमाळी एक्स्प्रेस २४ ते १७ मार्च दरम्यान दर शुक्रवारी पुण्याहून दुपारी साडेपाच वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता करमाळीला पोहोचेल. गाडी क्र. ०१४४६ करमाळीहुन २६ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान दर रविवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी करमाळीहून सुटेल, पुण्याला रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी पोचेल. गाडीला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा,
संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड
आणि थिविम स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.
----------------