कसबा पोटनिवडणुकीसाठी 
२७० मतदान केंद्रे

कसबा पोटनिवडणुकीसाठी २७० मतदान केंद्रे

पुणे, ता. २२ : कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेली तयारी अंतिम टप्प्यात आहे. यंदा मतदानासाठी सर्व २७० मतदान केंद्रे तळमजल्यावरच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी आणि शारीरिक विकलांगांना मतदान करणे शक्य होणार आहे, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक विकलांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर चाकाच्या खुर्चीची (व्हीलचेअर) आणि दोन सहायकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शारीरिक विकलांग आणि ज्येष्ठ नागरिकांना यंदा टपाली मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, चिंचवडमध्ये २२१ ज्येष्ठ नागरिक, तर केवळ तीन शारीरिक विकलांग, तसेच कसब्यात ३०२ ज्येष्ठ नागरिक आणि केवळ चार शारीरिक विकलांग नागरिकांनी टपाली मतदानासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये २२ हजार १५, तर कसब्यात २५ हजार ५०८ ज्येष्ठ आणि शारीरिक विकलांग मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याचे कळविले आहे. टपाली मतदानाची संधी देऊनही ज्येष्ठ आणि शारीरिक विकलांग मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करण्यावर भर दिल्याने प्रशासनाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर चाकाची खुर्ची आणि दोन सहायकांची नेमणूक केली आहे.

दरम्यान, कसब्यात दोन लाख ७५ हजार ६७९ मतदार असून, मतदान केंद्रांची संख्या २७० आहे. मतदान यंत्रे कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली असून, मतमोजणी देखील याच ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी १६ टेबलांची व्यवस्था केली असून, मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहेत.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com