एक लाख अर्जांपैकी ३१ हजारच पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक लाख अर्जांपैकी
३१ हजारच पात्र
एक लाख अर्जांपैकी ३१ हजारच पात्र

एक लाख अर्जांपैकी ३१ हजारच पात्र

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ : गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) पुणे व पिंपरी चिंचवडमधील सदनिकांसाठी काढलेल्या ऑनलाइन सोडतीसाठी वीस फेब्रुवारीपर्यंत एक लाख ११ हजार १३५ इच्छुकांनी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ ३१ हजार ६६० अर्जदार पात्र ठरले आहेत. तर ७५ हजार ७९८ अर्ज हे केवळ रहिवासी दाखल्याच्या संगणकीकृत पडताळीमुळे प्रलंबित असल्याचे सामेर आले आहे.
म्हाडातर्फे पाच हजार ९७२ सदनिकांसाठी जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच ऑनलाइन सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमध्ये इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएलएमएस) २.० या नूतन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये अर्ज भरताना पॅनकार्ड, आधारकार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रे संगणकीकृत करणे बंधनकारक करण्यात आले. परंतु २०१८ पूर्वीचे रहिवासी दाखला असणाऱ्या अर्जदारांना नवीन रहिवासी दाखल्याच्या क्रमांकाची अट टाकण्यात आली.
या सोडतीचा आढावा घेतल्यानंतर २० फेब्रुवारीपर्यंत एक लाख ११ हजार १३५ इच्छुकांनी अर्ज भरण्यापूर्वीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यापैकी केवळ ३१ हजार ६६० अर्जदारांचे अर्ज पैसे भरल्याने ते पात्र ठरले आहेत, तर ७५ हजार ७९८ अर्ज केवळ रहिवासी दाखल्याच्या संगणकीकृत पडताळणी अभावी प्रलंबित आहेत. रहिवासी दाखल्याबाबत दिलासा देण्याबाबत अर्जदारांकडून वारंवार मागणी करूनही कुठलाच बदल करण्यात आला नसल्याने समोर आले आहे.

रहिवासी प्रमाणपत्राबाबत अर्जदारांना दिलासा देण्यात आला असून अर्जदारांनी आपले सरकार संकेतस्थळावर जाऊन केवळ अर्ज नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर ऑनलाइन प्राप्त झालेला क्रमांक जुन्या रहिवासी प्रमाणपत्रासोबत संगणकीकृत केल्यावर अर्ज स्वीकृती करण्यात येईल. २७ तारखेपर्यंत ऑनलाइन, तर २८ तारखेपर्यंत आरटीडीएस, एनएफटीद्वारे पैसे भरण्याबाबत मुदत आहे. त्यानुसार शेवटच्या टप्प्यात अर्जांची संख्या वाढेल.
- नितीन माने पाटील, मुख्याधिकारी, म्हाडा

-----