महाविकास आघाडीचा रॅलीद्वारे प्रचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीचा रॅलीद्वारे प्रचार
महाविकास आघाडीचा रॅलीद्वारे प्रचार

महाविकास आघाडीचा रॅलीद्वारे प्रचार

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : पक्षाचे झेंडे...फटाक्यांचा दणदणाट, डोक्यावर गांधी टोप्या, जोरदार घोषणा अशा वातावरणात मतदारसंघातून रॅली काढत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शुक्रवारी प्रचाराची सांगता केली.
धंगेकर यांनी रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसघातील मतदारांपर्यंत पोचण्याचा आज प्रयत्न केला. लोहियानगर पोलिस चौकीपासून सकाळी साडेदहा वाजता रॅलीला प्रारंभ झाला. जीपमध्ये बसून लोकांना अभिवादन करत निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने महाविकास विकास आघाडीचे कार्यकर्ते दुचाकीवरून सहभागी झाले होते. ‘रवींद्र धंगेकर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी पुष्पगुच्छ व शाल देऊन धंगेकर यांचे स्वागत होत होते. घोरपडे पेठ पोलिस चौकीजवळ रॅली आल्यानंतर धंगेकर यांचे स्वागत करणारी भव्य रांगोळी काढण्यात आली होती. तेथून पुढे सिटी पोस्ट, हिराबाग चौक, एस. पी. कॉलेज, गांजवे चौक, दत्तवाडी म्हसोबा चौक, शनिवारवाडा, कामगार मैदान, साखळीपीर तालीम चौक, पांगुळ आळी आणि स्वामी समर्थ मठ रॅलीची सांगता झाली.
रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अरविंद शिंदे, अभय छाजेड, अविनाश बागवे, बापू बहिरट, संजय मोरे, संदीप गायकवाड, विशाल धनवडे, ज्ञानेश्वर ठोंबरे, महेश पवार, नीलेश गोरख, प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, युसूफ शेख आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

गेली तीस वर्षे मी या मतदारसंघात काम करीत आलो आहे. त्या कामाची पावती मतदार या वेळी देतील. पराजय होत आहे, हे लक्षात आल्याने विरोधकांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरू केला आहे. त्याला मतदार बधणार नाहीत. मी निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कसब्याच्या विकासासाठी काम करणार आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांची अर्धवट राहिलेली कामे मी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृत्तीमध्ये सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो.
- रवींद्र धंगेकर, उमेदवार, महाविकास आघाडी