महायुतीचा दुसऱ्यांदा रोड शो

महायुतीचा दुसऱ्यांदा रोड शो

पुणे, ता. २४ ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराज की जय... हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो... कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला.. कसब्याची पसंत रासने हेमंत... अशा घोषणा देत’’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी रोड शो करत शक्तीप्रदर्शन केले. कसबा मतदारसंघातील गंजपेठ, गुरुवार पेठ, रास्ता पेठ, बुधवार पेठ या दाट लोकवस्तीच्या भागातून समता भूमी ते लाल महल असा हा रोडशो करण्यात आला. या वेळी भाजपसह शिवसेनेही मोठ ताकद लावली होती.
शिंदे यांनी समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रोड शोला सुरवात केली. हातामध्ये भगवे झेंडे, महायुतीतील घटक पक्षांचे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या घालून महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. समता भूमी, जनाई मळा, पालखी विठोबा चौक, हिंदमाता चौक, डोके तालीम, लक्ष्मी रस्ता, फडके हौद ते कसबा गणपती अशी फेरी काढण्यात आली. या वेळी ढोल ताशा, बँड लावण्यात आला होता. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. चौकाचौकात क्रेनला मोठा हार लावून, फटाके फोडून, मुख्यमंत्री व इतर नेत्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन केले.

कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. खासदार गिरीश बापट यांनी त्याची बांधणी केली आहे. शहराचा विकास करण्यासाठी आणि मुक्ता टिळक यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसब्याची जनता मतदानरूपी आशीर्वाद देऊन निवडून देईल, असा विश्‍वास आहे.
- हेमंत रासने, उमेदवार, भाजप महायुती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com