मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

पुणे, ता. २४ : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, रविवारी (ता. २६) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कसबा पेठ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्‍यक ते मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्रांवर वेबकास्टींग, भरारी पथकांची नियुक्ती, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, अशी चोख तयारी निवडणुकीसाठी करण्यात आली आहे.
मतदानासाठी सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांना आवश्‍यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेवटचे व तिसरे प्रशिक्षण हे शनिवारी (ता.२५) गणेश कला क्रीडा मंदिर येथे होणार आहे. या प्रशिक्षणानंतर अधिकारी-कर्मचारी यांना मतदान यंत्राचे (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट) वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर अधिकारी -कर्मचारी रवाना होणार आहे. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पीएमपीकडून सुमारे ५० बसेस देण्यात आल्या आहेत.

आकडे बोलतात
- कसबा पेठ विधानसभेसाठी एकूण मतदार ः २,७५,६७९
- पुरुष मतदार ः १,३६,९८४
- महिला मतदार ः १,३८,६९०
- तृतीयपंथी संख्या ः ५
- अनिवासी भारतीय मतदार ः ११४
- दिव्यांग मतदार ः ६,५७०
- ८० वर्षांवरील मतदार ः १९,२४४
- मतदान केंद्रांची संख्या ः २७०
- संवेदनशील मतदान केंद्र ः ९

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी
- Voter Helpline App
- Pwd App (दिव्यांगांसाठी)
- www.ceo.maharashtra.gov.in
- https://electoralsearch.in

मतदानासाठी आवश्यक कागदपत्रे
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट (पारपत्र)
- वाहन चालक परवाना
- छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम,
सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
- छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक
- पॅनकार्ड
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) महसूल निर्मिती निर्देशांकद्वारे (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) दिलेले स्मार्टकार्ड
- मनरेगा जॉबकार्ड
- कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
- छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
- आधारकार्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com