आज, उद्या वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज, उद्या वाहतुकीत बदल
आज, उद्या वाहतुकीत बदल

आज, उद्या वाहतुकीत बदल

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वारगेट परिसरात २५ आणि २६ फेब्रुवारीला वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. स्वारगेट येथील जेधे चौक भुयारी मार्गातून सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच नटराज हॉटेल येथून सारसबागेकडे जाणाऱ्या भुयारी मार्गालगतच्या उजवीकडील सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी या रस्त्यावरील वाहने जेधे चौकातील भुयारी मार्गालगतच्या डाव्या बाजूच्या सेवा रस्त्याने वळविण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारीला सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच २६ फेब्रुवारीला सायंकाळी सात ते रात्री ९.३० वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहील. निवडणूक कर्मचारी मतदानाचे साहित्य गणेश कला क्रीडा रंगमंच येथून मतदान केंद्रावर घेऊन जाणार आहेत. मतदानाचे साहित्य सुरक्षित वेळेत पोचण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.