Sun, March 26, 2023

पैसेवाटपाविरोधात आज धंगेकरांचे उपोषण
पैसेवाटपाविरोधात आज धंगेकरांचे उपोषण
Published on : 24 February 2023, 6:45 am
पुणे, ता. २४ : कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप नेते आणि पदाधिकारी पोलिसांच्या उपस्थितीत
लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला असून, याविरोधात शनिवारी ते कसबा गणपती मंदिराबाहेर उपोषणाला बसणार आहेत. मतदानासाठी एक दिवस शिल्लक असताना धंगेकर यांनी भाजप नेते व पदाधिकारी पोलिस संरक्षणात पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे. यावर भाजपने धंगेकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत आमच्यावर विनाकारण आरोप केले जात असून, कसब्याचे मतदार सुज्ञ आहेत ते अशा अफवा व खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, अशी टीका पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.