अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

‘बीएमसीसी’मध्ये संकल्प दिन
पुणे, ता. २६ ः बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय आणि जम्मू काश्मीर अध्ययन केंद्राच्या वतीने संकल्प दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेफ्टनन जनरल (निवृत्त) राजेश निंभोरकर यांनी मार्गदर्शन केले. २२ फेब्रुवारी १९९४ रोजी संसदेत पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य अंग असल्याचा ठराव संमत करण्यात आला होता. याचीच स्मृती म्हणून दरवर्षी हा दिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
निंभोरकर यांनी काश्मीरचा प्राचीन काळापासूनचा इतिहासाचा आढावा घेतला. स्वातंत्र्योत्तर काळातील परिस्थितीही विशद केली. ते म्हणाले, ‘‘अतिरेक्यांपासून संरक्षणासाठी नागरिकांनी आणि सैनिकांनी बलिदान दिले. ३७० कलम हटविल्यानंतर परिस्थिती सामान्य होत असून, त्यासाठी थोडा अवधी लागणार आहे. पर्यटनाचे पुनरुज्जीवन, सफरचंद, केशर, काश्मिरी शॉलची निर्यात वाढल्यास तेथील अर्थव्यवस्था सुदृढ होईल.’’ प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांनी काश्मीरविषयक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्राचे अध्यक्ष प्रा. विनय चाटी, डॉ. ज्योती भाकरे, अतुल फडके, विशाल कडुसकर आदी उपस्थित होते.
---------
अद्ययावत नर्सिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन
पुणे, ता. ः महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेला ‘एक्सप्लिओ इंडिया इन्फो सिस्टम’ या कंपनीतर्फे देणगी देण्यात आली आहे. याद्वारे संस्थेच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आयटी येथे स्मार्ट ग्रंथालय आणि श्रीमती बगपळ तांबट नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये अद्ययावत नर्सिंग प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रसाद सतकर यांच्या हस्ते आणि सीएसआय प्रमुख सत्यजित पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, उपसचिव प्रदीप वाजे आदी उपस्थित होते.