तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त दागिने परत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त दागिने परत करा
तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त दागिने परत करा

तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त दागिने परत करा

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरझडतीतून जप्त केलेले ६५ लाख रुपयांचे दागिने सुपे व त्यांच्या कुटुंबीयांना परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी हा निकाल दिला.
सुपे यांच्या घरातून ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले होते. टीईटी प्रकरणात परीक्षार्थींकडून पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा आरोप सुपे यांच्यावर ठेवला आहे. सुपे यांना अटक केल्यानंतर तपासा दरम्यान सुपे यांच्या घरामधून, तुकाराम सुपेंचा जावई, मुलगा, नातेवाईक व मित्र मंडळींकडून सुपे यांनी पोलिस कोठडीत चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीवरून वेगवेगळ्या सात सुटकेसमध्ये भरून ठेवलेले दोन कोटी ३४ लाख रुपये रोख व ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने, पतसंस्थांमधील मुदत ठेवीच्या पावत्या, पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या मिळकतीचे कागदपत्रे जप्त केले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी तुकाराम सुपे, सुखदेव ढेरे यांसह १५ जणांविरोधात ३,९९५ पानांचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेले आहे.
१९ डिसेंबर २०२१ रोजी सुपे यांच्या घरझडतीत ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. ते परत मिळण्यासाठी सुपे यांनी ॲड. मिलिंद दत्तात्रेय पवार व ॲड. अक्षय शिंदे यांच्यामार्फत अर्ज केला होता. घरझडतीतून जप्त केलेले सोन्याचे दागिने हे तुकाराम सुपे यांच्या कुटुंबीयांच्या वापरातील व मालकीचे आहेत. त्या दागिन्यांचा व आरोपी सुपे यांचा काहीही संबंध नाही. जप्त केलेले दागिने हे सुपे यांच्या पत्नी, मुलगी, मुलगा, सून व जावई यांचे आहेत, असा युक्तिवाद ॲड. पवार व ॲड. शिंदे यांनी केला होता.