Wed, March 22, 2023

गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
Published on : 26 February 2023, 8:57 am
पुणे, ता. २६ : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ॲड. मिलिंद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्तीचा धनादेश फाउंडेशनच्या सदस्यांकडे सुपूर्त केला. याप्रसंगी फाउंडेशनचे कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ, मंदार बहिरट, युवराज ढवळे, सचिन जोशी, अभिषेक वडघुले उपस्थित होते. वडघुले म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास माहिती व्हावा, यासाठी ॲड. पवार हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी हे कृतीतून दाखवून दिले आहे.’’ ॲड. पवार यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला. हे आदर्शवत काम पुढे सुरू राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे प्रशांत धुमाळ यांनी नमूद केले.