Mon, May 29, 2023

मारहाणीचा जाब विचारल्याने तरुणावर हल्ला
मारहाणीचा जाब विचारल्याने तरुणावर हल्ला
Published on : 26 February 2023, 4:53 am
पुणे, ता. २६ : मारहाणीचा जाब विचारल्याचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला. त्याच्यावर पालघन व दगडाने वार करून गंभीररीत्या जखमी केले.
या प्रकरणी सागरसिंग कालुसिंग जुन्नी (वय ३६) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात लाखनसिंग, राजसिंग, मक्कनसिंग यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (ता. २४) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार यांचा मुलगा कृष्णा याला यातील एका आरोपीने शिवीगाळ केली होती. त्याबाबतचा जाब तक्रारदारांनी मारहाण करणाऱ्या मुलाच्या आईला विचारला होता. त्यावरून सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पालघनने त्यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष डांगे करीत आहेत.