Thur, June 1, 2023

पूना हॉस्पिटलतर्फे श्रवण तपासणी शिबिर
पूना हॉस्पिटलतर्फे श्रवण तपासणी शिबिर
Published on : 27 February 2023, 9:24 am
पुणे, ता. २७ ः पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे जागतिक श्रवण दिवसानिमित्ताने शुक्रवार (ता. ३) आणि शनिवारी (ता. ४) मोफत श्रवण तपासणी, सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रवण दोष असणाऱ्यांना या शिबिराचा फायदा होऊ शकेल. तसेच, श्रवण यंत्राची गरज असल्यास सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येईल. या शिबिराची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आहे.