
कोथरूडला शनिवारी सन्मान चित्रतपस्वीचा
पुणे, ता. २८ ः गायिका मनिषा निश्चल यांच्या ‘महक’ या संस्थेच्या तिसाव्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सन्मान चित्रतपस्वीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ४) सायंकाळी पाच वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यावेळी राजेश दामले हे मुलाखतीच्या माध्यमातून राजदत्त यांचा जीवनप्रवास उलगडणार आहेत. तसेच, गायिका मनिषा निश्चल, गायक जितेंद्र अभ्यंकर आणि वंडरबॉय पृथ्वीराज हे सह-कलाकारांच्या साथीने राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाजलेली गीते सादर करतील. या कार्यक्रमासाठी गेट सेट गो हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड, पूना गेस्ट हाऊस यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक कलारसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन निश्चल यांनी केले आहे.