‘मसाप’ला मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मसाप’ला मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार
‘मसाप’ला मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार

‘मसाप’ला मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः मराठी भाषेसाठी दिलेले लक्षणीय योगदान व कार्याबद्दल राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक रा. केळकर यांच्या नावे देण्यात येणारा ‘मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार, २०२२’ (संस्था) महाराष्ट्र साहित्य परिषदेला प्रदान करण्यात आला.
मराठी भाषा गौरवदिनी म्हणजे सोमवारी (ता. २७) मुंबई येथे आयोजित एका विशेष समारंभात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. रुपये दोन लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, अप्पर सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. ‘साहित्य संस्थांनी कालानुरूप बदलले पाहिजे ही भूमिका समोर ठेवून परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी परिषदेने आपल्या कार्यशैलीत बदल केला आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ घडवत परिषदेची वाटचाल सुरू राहील’, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.