संत रामपाल महाराजांच्या सत्संगाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत रामपाल महाराजांच्या सत्संगाला प्रतिसाद
संत रामपाल महाराजांच्या सत्संगाला प्रतिसाद

संत रामपाल महाराजांच्या सत्संगाला प्रतिसाद

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः जगद्गुरू तत्त्वदर्शी संत रामपाल महाराजांच्या आध्यात्मिक सत्संगाचे आयोजन नुकतेच चऱ्होली येथील मुक्ताई लॉन्स येथे केले होते. यामध्ये पुणे जिल्हा व परिसरातील हजारो भक्तगण उपस्थित होते.
सत्संग समाप्तीनंतर महाराजांच्या शिष्यांनी शिस्तबद्ध स्वरूपामध्ये शोभायात्रेचे आयोजन केले. रामपालजी महाराजांच्या आध्यात्मिक, सामाजिक, मानव उत्थानाच्या कार्याचे प्रदर्शन शोभायात्रेमध्ये करण्यात आले. येत्या २ ते ४ मार्च या कालावधीत संत गरीबदासजी महाराजांच्या बोध दिनानिमित्त देशभरातील दहा आश्रमांमध्ये धार्मिक भंडारा, रक्तदान शिबिर, हुंडामुक्त विवाह आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच २६ मार्च रोजी मुक्ताई लॉन्स येथे सकाळी ११ ते २ या वेळेत सत्संग आयोजित केले आहे, असे भक्त महेंद्र दास, मुरलीधर दास व सोमनाथ दास यांनी सांगितले.