आंदोलनाचा इशारा

आंदोलनाचा इशारा

आराखड्यातील चुका दुरुस्तीची मागणी
पुणे, ता. २८ : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हद्दीचा प्रसिद्ध केलेल्या प्रारूप आराखड्यात अनेक चुका आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. आराखड्यातील या चुका दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा विकास मंचाने निवेदनाद्वारे दिला आहे.
‘पीएमआरडीए’ने ऑगस्ट २०२१ मध्ये प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. त्यावर ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविल्या होत्या. प्रारूप विकास आराखड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्यामुळे ६० हजारांहून अधिक संख्येने नागरिकांनी स्वतः, तसेच मंचच्या माध्यमातून हरकती नोंदवल्या. विकास आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी पुणे महानगर हद्दीपासून १० किलोमीटर म्हणजे केसनंद, वाडेबोल्हाई, शिरसवडी अशी अनेक गावे, तसेच ‘एमआयडीसी’लगतच्या पाच किलोमीटर म्हणजेच सोनेसांगवी, ढोकसांगवी, बाभूळसर यासारख्या गावात वीस वर्षांहून अधिक काळ राहत असलेल्या नागरिकांच्या अन्याय करण्यात आला आहे, असे मंचाचे अध्यक्ष सदाशिव पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com