विद्यापीठात शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात
विद्यापीठात शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

विद्यापीठात शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. या वेळी भारतातील शिक्षण आणि वनस्पतीशास्त्र या विषयात काम करणारे शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.
विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत विभागाला निधी प्राप्त झाला असून, त्याअंतर्गत ही कार्यशाळा घेतल्याचे विभाग प्रमुख डॉ. ए.बी. नदाफ यांनी सांगितले. कार्यशाळेचे उद्‌घाटन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांनी केले. याप्रसंगी प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसच्या प्रमुख डॉ. स्मिता झिंजार्डे उपस्थित होत्या. तर, दुसऱ्या सत्रात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी विचार मांडले. तिसऱ्या सत्रात डॉ. संजीव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. चौथे सत्र हे गट चर्चेचे होते. यामध्ये बहुविद्याशाखीय शिक्षण, कौशल्य विकासाचे महत्त्व, मल्टिपल एन्ट्री व एक्झिट आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. शेवटच्या सत्रात प्रा.पंडित विद्यासागर यांनी आपले विचार मांडले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता व आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ.विजय खरे होते. समन्वयक म्हणून डॉ. हेमलता कोतकर, प्रा. मिलिंद सरदेसाई, डॉ. महेश बोर्डे, मंगेश हजारे यांनी काम पाहिले.