Tue, June 6, 2023

अभिनव विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव
अभिनव विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव
Published on : 28 February 2023, 3:59 am
पुणे, ता. २८ ः अभिनव विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला. विविध स्पर्धांमधील विजयी ठरलेल्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थेचे सचिव पी. एम. जोशीराव, बास्केटबॉल राष्ट्रीय खेळाडू सुजित अध्याय, डॉ. अविनाश प्रधान, डॉ. श्रीकांत जोशी, स्वप्नील पाटील, अपर्णा केळकर, मुख्याध्यापिका अमिता जोशी, उपमुख्याध्यापिका सुनीता कांगे उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी योगा, जिम्नॅस्टिक, पिरॅमिड यांची प्रात्यक्षिकेही सादर केली. सूत्रसंचालन शिक्षिका योगिता काळोखे व शीतल सातोसकर यांनी केले.