मराठी ः माझी मदर माऊली

मराठी ः माझी मदर माऊली

माझा अपघात झाल्यानंतर, ‘तुम्ही कोणत्या खात्यात कार्यरत आहात?,’ हे डॉक्टरांनी विचारले. माझी मदर माऊली मराठी माझ्या पाठीशी उभी असल्याने, ‘मी अतिक्रमण खात्यात कार्यरत आहे,’ हे बरोबर उत्तर मराठीतून दिले. परिणामी, मेंदूवरील शस्त्रक्रिया रद्द झाली. त्यामुळे मराठी भाषेशी माझे ऋणानुबंध आहेत.
- जयश्री अ. रजपूत

मला सासरी हिंदीतून बोलणे बंधनकारक असले तरी माझे शालेय व महाविद्यालय शिक्षण मराठी भाषेतून झालेले आहे. मी महापालिकेत मराठी लघुलेखक या पदावर सेवेत असताना विविध खात्यांत विविध योजनांमध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त व तत्कालीन खातेप्रमुख यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीचे इतिवृत्त मराठी भाषेतून केले. त्यामुळे मराठी भाषेचे बाळकडू लहानपणापासून मला अवगत आहे.
दरम्यान, फेब्रुवारी २०१६ मध्ये अपघातात डोक्‍याला मार लागल्यामुळे मला रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. मेंदू विशारद तज्ज्ञांच्या योग्य उपचारामुळे मला जीवदान मिळाले. काही दिवसांनंतर रुग्णालयातून घरी सोडताना मेंदू विशारद तज्ज्ञांनी माझी स्मरणशक्ती चाचणी (मेमरी टेस्ट) घेतली. अपघातप्रसंगी महापालिकेत तुम्ही कोणत्या खात्यात मराठी लघुलेखक पदावर कार्यरत आहात?, हे विचारले. माझी मदर माऊली मराठी माझ्या पाठीशी उभी असल्याने, ‘मी अतिक्रमण खात्यात कार्यरत आहे,’ हे बरोबर उत्तर मराठीतून दिले. तुमची स्मरणशक्ती ठीक आहे, असे निदान डॉक्‍टरांनी केले. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला. परिणामी, मेंदूवर होणारी शस्त्रक्रिया रद्द झाली. माझ्या आयुष्यातील कसोटीच्या परीक्षेचा क्षण आरोग्यदायी व भविष्याची शिदोरी आहे.
दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयांत विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्या दिवशी माझ्या कुटुंबीयांतील सर्वजण एकमेकांशी कटाक्षाने मराठीतून बोलतात. महाराष्ट्रीयन पद्धतीचे गोड जेवण करून मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला जातो. त्यामुळे मराठी भाषेशी माझे ऋणानुबंध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com