खूनप्रकरणी आरोपीला दोन वर्षानंतर अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खूनप्रकरणी आरोपीला दोन वर्षानंतर अटक
खूनप्रकरणी आरोपीला दोन वर्षानंतर अटक

खूनप्रकरणी आरोपीला दोन वर्षानंतर अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १ : बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली म्हणून एका संघटनेच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून खून करणाऱ्याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी गेल्या दोन वर्षांपासून फरार होता.
सचिन बाळू वारघडे (वय ३०, रा. ढेरंगे वस्ती, कोरेगाव भीमा, शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वारघडे आणि त्याच्या साथीदारांवर २०२० मध्ये गोविंद कुमकर यांचा कट रचून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमकर हे एका संघटनेचे कार्यकर्ते होते. त्यांनी पोलिसांना नगर रस्ता परिसरातील बेकायदा गावठी दारू धंद्याची माहिती देत त्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. नऊ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी पेरणेफाटा येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एका महिलेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाई केली होती. त्याचा राग वारघडे याच्या मनात होता. दरम्यान, १५ नोव्हेंबर २०२० रोजी कुमकर कामानिमित्त बाहेर निघाले होते. त्यावेळी आरोपी बाळू वारघडे, सुनीता चमरे, सत्यम चमरे, शुभम चमरे, राहुल वारघडे, सचिन वारघडे यांनी कोयता, कुऱ्हाडीने वार करून कुमकर यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह कारमधून पिंपरी सांडस येथील वनविभागाच्या जागेत फेकून दिला होता. या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, सचिन वारघडे फरार झाला होता. सायबर तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे, पोलिस शिपाई समीर पिलाणे यांना सचिन बहुळ गावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, सचिन चव्हाण, मल्हारी सपुरे, सागर पाटील आदींनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.