भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाचे नामकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाचे नामकरण
भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाचे नामकरण

भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाचे नामकरण

sakal_logo
By

पुणे, ता. १ : भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाचे नामकरण संस्थेचे संस्थापक विख्यात गणितज्ञ प्रा. श्रीराम शंकर अभ्यंकर यांच्या नावाने करण्यात आले आहे. हा नामकरण सोहळा गणितज्ञ प्रा. श्रीकांत भाटवडेकर यांच्या हस्ते झाला.

शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना गणित विषयाचे मार्गदर्शन, राष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील मुलांना मार्गदर्शन करण्याचे काम संस्थेतर्फे करण्यात येते. संस्थेचे समृद्ध ग्रंथालय संस्थेशी निगडित महाविद्यालयातील विद्यार्थी आणि अध्यापक, शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी उपलब्ध आहे. या प्रसंगी प्रा. श्रीधर शंकर अभ्यंकर, गणितज्ञ प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रा. शशिकांत कात्रे, प्रा. विनायक सोलापूरकर, प्रा. विनयकुमार आचार्य, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथील निवृत्त प्राध्यापक प्रा. नितीन नित्सुरे, किरण बर्वे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, कोलकता येथील प्रा. अमर्त्यकुमार दत्ता आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रा. दत्ता यांचे व्याख्यान झाले.