गांजा विक्रीस आलेला तस्कर ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांजा विक्रीस आलेला तस्कर ताब्यात
गांजा विक्रीस आलेला तस्कर ताब्यात

गांजा विक्रीस आलेला तस्कर ताब्यात

sakal_logo
By

पुणे, ता. १ : वाघोली परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोनने सापळा रचून पकडले आहे. त्याच्याकडून अडीच लाखांचा १२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. महादेव रामभाऊ खोडवे (वय ३४, रा. बाकोरी रोड, वाघोली) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून गांजासह दुचाकी व मोबाईल असा दोन लाख ६८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथक वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पेट्रोलिंग व गस्त घालत होते. या वेळी महादेव हा वाघोली येथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार, या माहितीची खातरजमा करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ किलो १७० ग्रॅम गांजा मिळाला. त्याच्याकडून एक मोबाईल व दुचाकी असा एकूण दोन लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.