‘वेणूगंधर्व संगीत महोत्सवा’चे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वेणूगंधर्व संगीत महोत्सवा’चे आयोजन
‘वेणूगंधर्व संगीत महोत्सवा’चे आयोजन

‘वेणूगंधर्व संगीत महोत्सवा’चे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः अमूल्य ज्योती आणि केशव वेणू प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ बासरीवादक डॉ. पं. केशव गिंडे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त वेणूगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (ता. ४) आणि रविवारी (ता. ५) एरंडवणेतील कर्नाटक हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात हा महोत्सव पार पडेल.

शनिवारी सायंकाळी ५ वाजता बासरीवादक दिपक भानुसे, गायक पं. सुधाकर चव्हाण, बासरीवादक पं. नित्यानंद हळदीपूर, गायक पं. उदय भवाळकर यांचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी सकाळी ९.३० वाजता डॉ. पं. केशव गिंडे आणि शिष्यांचा ‘कल्याण नवरंग सागर’ हा कार्यक्रम आणि विदुषी मंजिरी आलेगावकर, बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी व व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांची जुगलबंदी अनुभवायला मिळेल. दुपारच्या सत्रात ‘अमर बन्सी’ हा बासरीवादक अमर ओक यांचा कार्यक्रम आणि पं. प्रसाद खापर्डे यांच्या गायनाची मेजवानी रसिकांना मिळेल. त्यानंतर ‘नादब्रह्म’ या चित्रफितीचे उद्‍घाटन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते आणि ‘वेणू गंधर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते होणार आहे. पं. राजेंद्र प्रसन्ना यांच्या बासरीवादनाने या सोहळ्याची सांगता होईल. विनामूल्य प्रवेश असलेल्या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.