
आपली ओळख पुसून पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण ः गिरीश कुलकर्णी
पुणे, ता. २ : ‘‘सध्या आपल्याकडून स्वतःची ओळख पुसून पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण होत आहे. विविधतेने संपन्न असलेल्या प्रत्येक क्षेत्रात भारत पुढे आहे. भारताची संस्कृती आत्मसात केल्यास आपण पुढे जाऊ शकतो,’’ असे मत दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डसाठी १०२ भारतीय मिष्टान्न प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. अवघ्या चार तासांत एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हे पदार्थ तयार केले. या वेळी कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक, विद्यापीठाच्या प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणती रोहित टिळक, प्र. कुलसचिव डॉ. अभिजित जोशी, टिमवि ट्रस्टचे सचिव अजित खाडीलकर, हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. सुवर्णा साठे आदी या वेळी उपस्थित होते.