Mon, June 5, 2023

माहेश्वरी ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर
माहेश्वरी ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर
Published on : 2 March 2023, 2:06 am
पुणे, ता. २ ः भारतीय माहेश्वरी एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोंढव्यातील शेठ श्री गंगाधर बन्सीलाल राठी माहेश्वरी हॉस्टेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘रक्ताचे नाते’ या संस्थेचे अध्यक्ष राम बांगड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे कोषाध्यक्ष राजेंद्र चांडक, विश्वस्त राजेंद्र धूत आणि श्याम लढ्ढा आदी उपस्थित होते. केईएम रूग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रक्त संचलनाचे काम केले. या वेळी संस्थेतील १२७ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.