
कर्वे गुरूजी यांना ‘एमआयटी’त श्रद्धांजली
पुणे, ता. २ ः विनम्र, साधेपणा व प्रसन्नपणे आपले जीवन व्यतीत करणारे श्रीकृष्ण (विश्वनाथ) गोपाळ कर्वे गुरूजी अत्यंत निर्मळ, निरलस, सात्त्विक व प्रसन्न व्यक्तिमत्व होते. त्यांचे जाणे हे मनाला वेदना देणारे आहे., असे मत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केले. कर्वे गुरूजी यांना गुरूवारी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस. एम. पठाण, डॉ. प्रियंकर उपाध्याय, पं. वसंतराव गाडगीळ व महेश थोरवे उपस्थित होते. डॉ. कराड म्हणाले, ‘‘कर्वे गुरूजी हे माझे गुरू होते. त्यामुळे त्यांनी मला संस्थेच्या जडणघडणीमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने वैयक्तिक माझी व संस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.’’