भाजपचा २८ वर्षांचा बालेकिल्ला ढासळला!

भाजपचा २८ वर्षांचा बालेकिल्ला ढासळला!

पुणे, ता. २ : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कसबा विधानसभा मतदारसंघ पक्षाला २८ वर्षांनंतर गमवावा लागला. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेसने येथील पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव केला. मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडीवर असणाऱ्या काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी २० व्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर १० हजार ९५० मतांनी मात केली.

यापूर्वी १९९१ मधील एका पोटनिवडणुकीतच काँग्रेसला येथे यश मिळाले होते. १९९१ ला भाजपचे कसब्याचे आमदार अण्णा जोशी हे खासदार म्हणून लोकसभेला निवडून आल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून गिरीश बापट यांना संधी देण्यात आली होती. तर काँग्रेसने त्यावेळी वसंत ऊर्फ तात्या थोरात यांना उमेदवारी दिली. या वेळी थोरात यांनी बापट यांचा सुमारे साडेपाच हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर १९९५ ला पहिल्यांदा निवडून आलेल्या बापट यांनी पुढे १९९९, २००४, २००९, २०१४ असे तब्बल पाच वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गेल्या निवडणुकीत २०१९ मध्ये भाजपकडून मुक्ता टिळक या विजयी झाल्या. अशा प्रकारे तब्बल सहा वेळा येथून भाजपचे उमेदवार विजयी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com