पुण्यात मधुमेह परिषदेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात मधुमेह परिषदेचे आयोजन
पुण्यात मधुमेह परिषदेचे आयोजन

पुण्यात मधुमेह परिषदेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २ : चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटतर्फे सातव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे आयोजन पुण्यात केले आहे. येत्या १० ते १२ मार्च दरम्यान ही परिषद होईल. मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेणे, हा या परिषदेचा उद्देश आहे. चिन्मय मिशनचे स्वामी स्वरूपानंदजी आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन एजी यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘या मधुमेह परिषदेमध्ये प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ हे मधुमेह उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करतील. ही परिषद एक शैक्षणिक व्यासपीठ आहे.’’ संस्थेचे संचालक डॉ. (ब्रिगेडियर) अनिल पंडित या वेळी उपस्थित होते.