मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

पुणे, ता. २ : मतमोजणीला सुरवात झाली...कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. पहिल्या फेरीत काँग्रेसचे कार्यकर्ते खूष होते. तर दुसऱ्या फेरीत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. पण त्यानंतर काँग्रेसची आघाडी वाढत गेली आणि वातावरण महाविकास आघाडीच्या उत्साहात रंगून गेले. ‘‘गणपती बाप्पा मोरया....महाविकास आघाडीचा विजय असो... ही इज धंगेकर.. ही इज धंगेकर...५० खोके एकदम ओके... आला रे आला कसब्याचा वाघ आला,’’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. हे चित्र होते कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदाम येथील मतमोजणी केंद्रावरील.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शासकीय गोदाम येथे सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. त्यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीचे आणि भाजप व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांची आघाडी वाढत गेली. मतमोजणी केंद्रात व केंद्राबाहेर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी सुरू केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com