संत संमेलनचे उद्या आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत संमेलनचे उद्या आयोजन
संत संमेलनचे उद्या आयोजन

संत संमेलनचे उद्या आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान व मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक फाउंडेशनच्या पुढाकारातून पुणे शहरात प्रथमच संत संमेलन व दर्शन सोहळा होत आहे. हे संमेलन येत्या रविवारी (ता. ५) गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक भवन येथे होणार आहे, अशी माहिती संयोजकांतर्फे प्रकाश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिंदे म्हणाले, ‘‘या संत संमेलनात श्री शिवशक्ती कालिदास धाम संपाला हरियाना येथील महंत कालिदास महाराज, पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंत्री अशोक महाराज, पंचदशनाम जुना आखाडा हरिद्वार येथील महामंडलेश्वर प्रेमगिरी महाराज, हरिगिरी महाराज, किन्नर जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य लक्ष्मीनंद गिरी, महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्यासह अनेक मठाधिपती, ५०० नागा साधू, १५ वाचासिद्धी संत, महात्मे उपस्थित राहणार आहेत.’’
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी संयोजक राहुल गोसावी, शिवाजी करंजुले, अतुल भोसले, नंदकिशोर शहाडे आदी उपस्थित होते.