पॅरा योगा दिव्यांगांसाठी एक भव्य व्यासपीठ ः प्रताप पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॅरा  योगा दिव्यांगांसाठी एक
भव्य व्यासपीठ ः प्रताप पवार
पॅरा योगा दिव्यांगांसाठी एक भव्य व्यासपीठ ः प्रताप पवार

पॅरा योगा दिव्यांगांसाठी एक भव्य व्यासपीठ ः प्रताप पवार

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः ‘‘समाजातील उपेक्षित दिव्यांग व्यक्तींच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी व त्यांच्या मनात आत्मविश्वास व एक प्रकारची विशिष्ट जिद्द निर्माण करण्याच्या दृष्टिने पॅरा योगासारख्या स्पर्धेद्वारे एक भव्य व्यासपीठ निर्माण होईल’’, असे प्रतिपादन या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रताप पवार यांनी केले.

महाराष्ट्र योगासन क्रीडा संघटनेच्या सूचनेनुसार आणि पॅरा (दिव्यांग) योगासन क्रीडा समितीच्या आधिपत्याखाली प्रथम राज्यस्तरीय पॅरा (दिव्यांग) योगासन क्रीडा स्पर्धा २०२२-२३ या २५ व २६ फेब्रुवारी रोजी औंधमधील बाल कल्याण संस्थेमध्ये झाल्या. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार योगासनाला खेळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, विविध दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजात एक आयाम मिळवून देण्यासाठी तसेच प्रतिभावान खेळाडूंना त्यांचे प्रदर्शन सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
योग स्पर्धा व तीही दिव्यांग व्यक्तींसाठी म्हणजे एक आव्हानच होते. यासाठी अनेक मान्यवरांनी, योग प्रशिक्षकांनी, क्रीडा शिक्षकांनी गेली आठ महिने घेतलेली मेहनत, कष्ट व जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक व आत्मश्विासाने दिलेला अनमोल सहयोग यामुळेच ही स्पर्धा आज यशस्वीरीत्या पार पडली, असे मत महाराष्ट्र पॅरा योग समितीच्या अध्यक्षा डॉ. सुनंदा राठी व्यक्त केले.
महाराष्ट्र पॅरा योगाचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी ही स्पर्धा किंवा या क्षेत्रात कार्य करणे व ते करण्यासाठी संधी मिळणे हे आमच्यासाठी प्रेरणादायी होते. त्याचप्रमाणे या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी केलेली योग प्रात्यक्षिके पाहणे हा सुखद अनुभव होता, असे नमूद केले व या स्पर्धेला योग्यरित्या पार पाडण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल सहभागी मान्यवर, प्रशिक्षक, शिक्षक व ज्युरी सदस्यांचे आभार मानले.