‘कर्मा ॲण्ड यू’ पुस्तकाचे प्रकाशन

‘कर्मा ॲण्ड यू’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे ः प्रभा खेतान फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित समारंभात लेखक आणि उद्योजक राम शर्मा लिखित ‘कर्मा अँड यू-क्रिएट युवर ओन डेस्टिनी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ‘एहसास महिला, नागपूर’च्या सदस्या ज्योती कपूर यांनी पुस्तकाशी संबंधित विविध पैलूंवर राम शर्मा यांच्याशी संवाद साधला. लेखक शर्मा म्हणाले, ‘‘माझे हे पुस्तक मानवी जीवनातील प्रत्येक पैलू किंवा कामाशी संबंधित परिस्थितींना स्पर्श करते. मी कर्माची वेगवेगळ्या पैलूंमध्ये विभागणी केली आहे आणि त्याचा तुमच्या कुटुंबावर, मुलांवर, नातेसंबंधांवर, व्यवसायावर आणि प्रत्येक पैलूवर कसा परिणाम होतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.’’

मंजिरी देवधर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
पुणे ः कवयित्री मंजिरी देवधर यांच्या ‘मन उलगडताना’ या काव्य संग्रहाचे आणि ‘क्षण सांगून जातात तेव्हा’ या स्फुट लेखसंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि कवी व गीतकार जयंत भिडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. वैद्य म्हणाल्या, ‘‘देवधर यांची कविता ही सहज उमललेल्या फुलासारखी आहे, तशीच ती आशयगर्भ, नितळ, सुंदर आहे. मनाला हात घालणे हे कौशल्याचे काम आहे, ते कवयित्रीला उत्तम जमले आहे. कवितेची भाषा साधी, सोपी, सरळ आहे, हे कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.’’ देवधर यांनी ‘मन उलगडताना’ या काव्यसंग्रहातील कविता रसिकांना देऊन साहित्य दरबारात मोलाची भर टाकली आहे, असे भिडे यांनी सांगितले.

‘चंद्रनगरीतील वृक्ष’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे ः वनौषधी, अध्यात्म आणि पर्यावरण यांचा त्रिवेणी संगम नक्षत्रवाटिकेत सापडतो. नक्षत्रवाटिका ही वर्तमान आणि भविष्यकाळाची गरज असून त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे मानवी अस्तित्वासाठी आवश्यक आहे, असे मत गुजरात येथील आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. एम. सी. वार्ष्णेय यांनी व्यक्त केले. डॉ. किरण कुलकर्णी लिखित ‘चंद्रनगरीतील वृक्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रो. वार्ष्णेय यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवृत्त अप्पर पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग भोसले, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाचे प्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन, नानल आयुकेअरच्या सल्लागार डॉ. ऐशा नानल, मित्तल हॅप्पी काऊ डेअरी फार्मचे चेअरमन नरेश मित्तल, पुस्तकाच्या सहलेखिका मेघा शिंदे आदी उपस्थित होते. ‘जागतिक पातळीवर वातावरण बदलाची चर्चा होत असून यातून आपण आपल्या पारंपारिक गोष्टींचा ध्यास घेण्याची गरज सिद्ध होत आहे’, असे भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com