पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची दस्त नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची दस्त नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची दस्त नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची दस्त नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे,ता. ३ : ​पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्र.12 येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल गटासाठी 3 हजार 317 सदनिका व अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 566 सदनिका अशा एकुण 4 हजार 883 सदनिकांचा गृहप्रकल्पातील सदनिकांची ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढण्यात आली होती. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या ज्या लाभार्थ्यांनी सदनिकेची पुर्ण रक्कम भरलेली आहे, त्यांच्या समवेत दस्त नोंदणीची प्रक्रिया येत्या सोमवार (ता.६) पासुन ई-नोंदणी पध्दतीने करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएने कळविले.
ई-नोंदणी प्रक्रियेची सुविधा नोंदणी महानिरीक्षक यांचेकडुन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागणार नाही. ई-नोंदणीचे इमारतीनिहाय वेळापत्रक लाभार्थ्यांसाठी पीएमआरडीएच्या ऑनलाईन पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आले आहे, असेही पीएमआरडीएचे सह आयुक्त बन्सी गवळी यांनी सांगितले.
सदनिकांची ई नोंदणी काम ​पेठ क्र.24 जुने प्राधिकरण कार्यालय, टिळक चौक, निगडी येथे होणार आहे. लाभार्थ्यांना नोंदणीच्या प्रक्रियेबाबतच्या सविस्तर सूचना पोर्टलवर यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. लाभार्थ्यांना नोंदणीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे शुल्क(सदनिका विक्री किंमतीचा शेवटचा हप्ता, विलंब शुल्क, स्टॅम्प डयुटी, सोसायटी नोंदणी शुल्क, देखभाल खर्च वगैरे) अदा करणे अनिवार्य आहे. सदर शुल्क नोंदणी वेळापत्रकाच्या किमान चार दिवस आधी भरणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड व ओटीपीसाठी आधारकार्डला लिंक असणारा मोबाईल सोबत घेऊन येणे आवश्‍यक आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर सोसायटी नोंदणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन तात्काळ ताबा देण्याची कार्यवाही करता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सकाळी अकरा वाजता नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक यांचे हस्ते ई-नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ होणार असून यावेळक्ष महानगर आयुक्त राहूल महिवाल यावेळी उपस्थित राहणार आहेत.
----------