
निवेदिता प्रतिष्ठानतर्फे ललना कला महोत्सवाचे आयोजन
पुणे, ता. ४ ः निवेदिता प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘ललना कला महोत्सव’ आणि ‘ललना कलारत्न पुरस्कार सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा राज्य व राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या तीन महिला कलाकारांना ललना कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती निवेदिता प्रतिष्ठानच्या ॲड. अनुराधा भारती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रतिष्ठानच्यावतीने यंदा राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भरत नाट्य नृत्यांगना डॉ. प्रियाश्री गणेश, आंतरराष्ट्रीय स्तरावर रिदमिक जिमनॅस्टिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या ईरा रावत आणि स्नेहालय संस्थेतील राजश्री पाटील यांनी बास्केट बॉल खेळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या तिघींना ‘ललना कलारत्न’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा कार्यक्रम येत्या गुरुवारी (ता. ९) सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.