शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक धोरणावर 
राष्ट्रीय परिषद
शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय परिषद

शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठातील शिक्षणशास्त्र प्रशाला आणि शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग, कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन फाउंडेशन (सीटीईएफ) आणि मॅप इपिक कम्युनिकेशन यांच्यावतीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चंद्रकांत रागीट, सि-मेटचे महासंचालक डॉ. भारत काळे, सीटीईएफचे राष्ट्रीय अध्यक्ष केशव भांडारकर, आंतरराष्ट्रीय सचिव डॉ. नीलिमा भागवती, मॅप एपिकचे संचालक मंदार नामजोशी, जोहाना लॅम्पीनेन, ऑड्रे पॅराडीस, दक्षिण पूर्व नॉर्वे विद्यापीठाचे आसमंड आमास, डॉ. वैभव जाधव, डॉ. अश्विनी दातार, अवधूत गोडबोले, डॉ. गीता शिंदे आदी उपस्थित होते. परिषदेसाठी फिनलंड आणि नॉर्वे येथून जवळपास ३० परदेशी अभ्यासक उपस्थित होते.