चिरंजीव फाउंडेशनतर्फे ‘दैनंदिन गीता’ यावर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिरंजीव फाउंडेशनतर्फे 
‘दैनंदिन गीता’ यावर व्याख्यान
चिरंजीव फाउंडेशनतर्फे ‘दैनंदिन गीता’ यावर व्याख्यान

चिरंजीव फाउंडेशनतर्फे ‘दैनंदिन गीता’ यावर व्याख्यान

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः भगवतगीतेबद्दल सर्वसामान्यांना अर्थपूर्ण माहिती व्हावी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने चिरंजीव फाउंडेशनतर्फे संत साहित्याच्या अभ्यासक धनश्री लेले (ठाणे) यांचे ‘दैनंदिन गीता’ या विषयावर येत्या बुधवारी (ता. ८) सायंकाळी ५. ३० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शिवदर्शन चौकातील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये हा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमादरम्यान ‘भगवतगीता’ या विषयावर आधारित. ‘योग कर्मसु कौशलम्’ यात सहभागी व तसेच योग क्षेत्रात अभ्यास पूर्ण केलेल्या सदस्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती चिरंजीव फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. सुनंदा राठी यांनी दिली. भगवद्गीता आजच्या काळातही उपयोगी आहे. या ग्रंथातील तत्त्वे, दैनंदिन जीवनात कशी उपयोगात आणता येतात, यासाठी आजचा हा दैनंदिन गीता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.