
मराठी भाषा गौरव दिन पूना कॉलेजमध्ये साजरा
पुणे, ता. ४ ः पुण्याच्या पूना कॉलेजमध्ये कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना स्तर-२ यांच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. अन्वर शेख यांनी भाषा ही विसंवादाचे साधन नसून संवादाचे साधन आहे. मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात सर्वांनी वापर करावा, असे आवाहन शेख यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक अविनाश हळबे हे उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी भाषेचे महत्त्व व इतिहास सांगितला. मराठी विभाग प्रमुख प्रा. जुबेर पटेल यांनी कुसुमाग्रजांचा जीवन परिचय सांगून मराठी भाषेतील साहित्यिकांची ओळख करून दिली. उपप्राचार्य प्रा. इम्तियाज आगा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. असद शेख व इम्रान पठाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. लुबना खान, प्रा. नाज सय्यद, पर्यवेक्षिका प्रा. नसीम खान, डॉ. सलीम मणियार, प्रा. रुक्साना मनेरी, प्रा. गुलाम अहेमद, प्रा. इम्रान मोमीन, प्रा. मसूद.