
स्वस्तात कपडे खरेदीची आजच संधी
पुणे, ता. ४ : देशातील सर्व प्रिमियम मॉल आणि शोरूमचा स्टॉक जमा करून गुंतवणूक वसुली करण्यासाठी हा सर्व स्टॉक पुणेकर ग्राहकांसाठी कर्वेनगरमधील महालक्ष्मी लॉनमध्ये खुला केला आहे. येथे स्वस्तात कपडे आणि शूज, पादत्राणे मिळणार आहेत. या सेलचा रविवार (ता. ५) हा अखेरचा दिवस आहे.
उत्पादन खर्चापेक्षाही कमी भावात जवळपास ८० टक्के सवलतीत ही विक्री सुरू आहे. १५०० ते ४९०० रुपयांपर्यंत विकले जाणारे पुरुष आणि महिलांचे ब्रॅन्डेड गारमेंट्स फक्त ३०० ते १५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. जीन्स, ब्रॅंडेड शर्टही ४५० रुपयांपासून आहेत. लेदर ब्रॅंडेड फॉर्मल आणि पार्टी वेअर जेन्टस् शूजही ३०० ते १५०० रूपयांत आहेत. लखनवी चिकन कुर्ती, जयपुरी कुर्ती ७५० रुपयांपासून ग्राहकांना मिळेल तर लहान मुलांचे कपडे १५० रुपयांपासून आहेत. ब्रॅंडेड कंपन्यांचे शूज ८० टक्के सवलतीत आहेत. सेलमध्ये जीन्स, ट्राउजर आणि कॉटन ट्राउरची ब्रांडेड व एक्सक्लुसिव रेंज आहे. डीपी रस्त्यावर राजाराम पुलाजवळ कर्वेनगरमधील महालक्ष्मी लॉन्समध्ये सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हा सेल खुला आहे.