Wed, May 31, 2023

डिजिटल साक्षरता कार्यशाळा उत्साहात
डिजिटल साक्षरता कार्यशाळा उत्साहात
Published on : 5 March 2023, 2:55 am
पुणे, ता. ५ : यशस्वी ॲकॅडमी फॉर स्किल्स आणि लर्निंग लिंक फाउंडेशनच्या वतीने ‘आर्थिक व डिजिटल साक्षरता’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, उद्योजकता विकास, मार्केटिंग, उद्योग नोंदणी, बँक व्यवहार, बिझनेस प्लॅन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लर्निंग लिंक फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य व्यवस्थापिका सनम शेख, यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, डॉ. मंजूषा कुलकर्णी आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक स्वाती दुधाले यांनी केले, तर सूत्रसंचालन रेखा कापसे यांनी केले. फाउंडेशनच्या प्रकल्प समन्वयक स्मिता गोगटे यांनी आभार मानले.