चंद्रकांत पाटलांनी घेतली
बापट, रासने यांची भेट

चंद्रकांत पाटलांनी घेतली बापट, रासने यांची भेट

पुणे, ता. ५ : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार गिरीश बापट आणि उमेदवार हेमंत रासने यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, असे पाटील यांनी सांगितले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करून ते उमेदवार हेमंत रासने यांच्या घरी गेले. त्यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोटनिवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. संघर्षाच्या बळावरच आपण अनेक आव्हाने समर्थपणे परतवून लावली आहेत. कोणीही खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा, आगामी काळात विजय आपलाच आहे. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी आहे.’’
रासने यांच्या पत्नी मृणाली रासने यांनी निवडणुकीच्या काळात सर्वांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. यातून सर्वांचे रासने कुटुंबासोबत अतूट नाते निर्माण झाले आहे. हे नाते जपण्यासोबतच अजून पुढे वाढविणार असल्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com