राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

sakal_logo
By

पुणे ः पांडवनगरमधील हुतात्मा राजगुरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्होकेशनल विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी आघारकर अनुसंधान संस्थेला भेट दिली. विद्यार्थ्यांनामध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी हा दिन साजरा करण्यात आला. आघारकर अनुसंधान संस्थेमधील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे प्रदर्शन मांडले होते. विविध जीवाश्म स्लाईड्स, दगडफूल व इतर औषधी वनस्पतीच्या विषयी विविध प्रयोग विद्यार्थ्यांना बघण्यास मिळाले. यावेळी प्रश्नमंजूषा झाली. त्यात विद्यालयातील लहान गटामधून संकेत रमेश खरात व मोठ्या गटामधून सुमीत ज्ञानेश्वर चव्हाण या विद्यार्थ्यांना पहिले बक्षीस मिळाले. यावेळी डॉ. सी. व्ही. रामन यांचा रामन इफेक्ट साजरा करण्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्यांसह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

नूतन भारत विद्यालयात होळी सण साजरा
पुणे ः नूतन भारत मराठी विद्यालयात ‘राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट’च्या संकल्पनेतून होळी हा सण वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम विद्यार्थ्यांना होळीची माहिती सांगण्यात आली. माहिती सांगताना आपल्या मनातले वाईट विचार, वाईट शब्द, राग, लोभ, मत्सर या वाईट गोष्टींची होळीमध्ये आहुती देण्याची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. तसेच सर्व प्रकारच्या वाईट विचारांना व सवयींना आपल्यापासून दूर ठेवा, असे मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील दळवी यांनी सांगितले. यावेळी रांगोळी शिक्षिका सुषमा पोटे व शिक्षक सुधीर दाते व प्रभारी मुख्याध्यापिका संध्या पांढरे आदी उपस्थित होते.
---------------