Sun, June 4, 2023

‘टल्लू’ फाउंडेशनतर्फे शरदचंद्र पाटणकर यांचा गौरव
‘टल्लू’ फाउंडेशनतर्फे शरदचंद्र पाटणकर यांचा गौरव
Published on : 7 March 2023, 11:35 am
पुणे, ता. ७ ः विविध सामाजिक संस्थांना एक कोटींहून अधिक रुपयांची मदत केल्याबद्दल लायन्स क्लब इंटरनॅशनलचे लाइफ मेंबर व माजी प्रांतपाल शरदचंद्र पाटणकर यांचा अंबादास टल्लू फाउंडेशनतर्फे नुकताच गौरव करण्यात आला.
पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती यांच्या हस्ते हा सत्कार झाला. पाटणकर यांनी आत्तापर्यंत वृद्धाश्रम, गोशाळा, गरिबांसाठी वैद्यकीय, शैक्षणिक मदत करणाऱ्या अनेक संस्थांना भेटी देत कामाची पाहणी करून मदत केली आहे. जनसेवा फाउंडेशन, शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल, ज्ञान प्रबोधिनी, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, बाबा आमटे यांच्या आनंदवन अशा १००हून अधिक संस्थाना एक कोटी रुपया पेक्षा जास्त आर्थिक मदत केलेली आहे.