दस्त नोंदणीसाठी ई केंद्राची सुरुवात

दस्त नोंदणीसाठी ई केंद्राची सुरुवात

पुणे, ता. ७ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विकसित केलेल्या पेठ क्र.१२ मधील गृहयोजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी दस्त नोंदणीसाठी ई नोंदणी केंद्राची सुरुवात आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरीक्त आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त नोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर, सहआयुक्त बन्सी गवळी, नोंदणी उपमहानिरिक्षक दीपक सोनवणे उपस्थित होते. या गृहयोजनेत सुमारे चार हजार ८०० घरकुले बांधण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे चार हजार सदनिकांचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात आले आहे. या सर्व सदनिकांच्या दस्त नोंदणीसाठी प्राधिकरणाच्या वतीने हे ई नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून दररोज सुमारे १०० ते १५० पात्र लाभार्थ्यांची सदनिकांची नोंदणी करणे शक्य होणार आहे, असे जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com