नऊवारी साडी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंतीचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नऊवारी साडी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंतीचा उपक्रम
नऊवारी साडी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंतीचा उपक्रम

नऊवारी साडी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंतीचा उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः देशाची आणि महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोचविण्यासाठी चिंचवड येथील रमिला लटपटे या तरुणीने अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत ती नऊवारी साडी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणार आहे. अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचा हा उपक्रम ती राबवत आहे. ही मोहीम गुरुवारी (ता. ९) दुपारी साडेचार वाजता मुंबईतून झेंडा दाखवून सुरू होईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सुमारे ३६५ दिवसांचा कालावधी पूर्ण करत ८ मार्च २०२४ रोजी रमिला पुन्हा भारतात परतणार आहे. यामध्ये सुमारे ३० देशातून प्रवास करत महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्या माध्यमातून बनविलेल्या विविध पदार्थाचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशापर्यंत पोहोचविण्याचा मानस रमिलाचा आहे.